नागपंचमी
नागपंचमी
1 min
491
श्रावणाच्या महिन्यात
संण पंचमीचा येतो
शेता चालता वाटेला
बाप मुऱ्हाळी भासतो ।।
सण माझ्या सपनात
नागपंचमीचा येतो
बंधू माझा बळी राजा
झोका झाडाला बांधतो ।।
नागपंचमीच्या सणा
सय येते माहेराची
बंधू मुऱ्हाळी गं माझा
गाडी आणे घुंगराची ।।
नागपंचमीचा सण
बाई जाते वारुळाला
दुध लाह्या घेवूनीया
नागोबाला पुजायाला ।।
शालू लेवून नटली
हाती मेहंदी रंगली
वेणी माळून गजरा
लेक माहेरी सजली ।।