मुंबई आता मरणार
मुंबई आता मरणार
शहर वाढतंय पाण्याचा
साठा कमी आहे
मुंबई आता मरणार
याची हमी आहे || 0 ||
ताण किती शहरावर
पडावा सतत
तोच तोच इतिहास
घडावा सतत
त्रस्त इथे झाला
मराठी आदमी आहे
मुंबई आता मरणार
याची हमी आहे || 1 ||
लुंगी उठाव पासून
घडत आले सारे
मराठी मुद्द्यासाठी
लढत आले सारे
परप्रांतीयांचे लोंढे
जुनी बातमी आहे
मुंबई आता मरणार
याची हमी आहे || 2 ||