Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepa Vankudre

Others

4.0  

Deepa Vankudre

Others

मराठी भाषा गुणगौरव

मराठी भाषा गुणगौरव

1 min
353


माय मराठी माझी सगुण,भाषा जणू शर्करा गोड,

तिची महती किती गाऊ,त्यास नाही कशाची तोड!


भाळी कुंकू, गळी मंगळसुत्र,नाकात नथ, डोक्यावर पदर,

मराठीचे असे रूप देखणे,जणू सौभाग्यवती सुंदर!


साहित्य लेखणीची तडफ,जणू मर्द मराठ्याची तलवार,

शाहिराच्या पोवाड्यात डफ,ऐतिहासिक शब्दावर स्वार!


लावणीत मराठी श्रृंगारते, ललितात भाव ओथंबतात, 

नाट्यात छटा रंगतात, काव्यरसात पद्य पाझरतात! 


ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी रचिलीसंतवाणीत जीवनाचे सार अभंग,

ओवी, लोकगीते सर्वात दिसे आयुष्य आरपार


बाह्य रूप जरी बदलले तरी,मराठी बाणा आहे जोपासला, 

राज्याच्या मातीत भाषा वृक्ष,संस्कार खताने आहे रूजवला! 


Rate this content
Log in