Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

मोर्चात सामील होऊ द्या

मोर्चात सामील होऊ द्या

1 min
179


मोर्चात सामील होऊ द्या की रे


चाल : काठी नी घोंगडं...


अरे तुमच्या संग मला बी येऊ द्या की रे

मोर्चात सामील होऊ द्या की...


जुनी पेन्शन मला बी मिळू द्या की रं

 मोर्चात सामील होऊ द्या की...


पेन्शन बंद करून शासनानं दिले फुकटच टेन्शन ,

आहे जीवनाचा प्रश्न म्हणून 

हे मोर्चा आंदोलन 

आत जोमाने चालू राहू द्या.... 

लढा जोमाने चालू हा राहू द्या की र 

मला बी मोर्चात येऊ द्या की...


ते आमदार मंत्री खासदार

 मिळते पेन्शन त्यांना चार

 तिजोरीवर हा भार

 का अन्याय आम्हावर 

 म्हणून लढा चालू राहू द्या...

 लढा जोमाने चालू राहू द्या की रं ....


आझाद मैदान मंत्रालयावर 

कलेक्टर ऑफिस तहसीलवर

 चाले मोर्चा हा महाराष्ट्रभर

आहे शासन हे कठोर 

जागा शासनाला आता येऊ द्या

 मागणी पेन्शनची जोमाने होऊ द्या की रं...


मोर्चात सर्वांनी सामील व्हावे

 सर्व कार्यालय बंद असावे

 एवढं लक्षात सर्वांनी घ्यावे

 शासनाला वेठीस धरावे

 एकजुटीने मागणी होऊ द्या

 या लढ्याला यश आता येऊ द्या की र.....


तुमच्या संग मला येऊ द्या कि रं

मोर्चात सामील होऊ द्या की...

 जुनी पेन्शन मला बी मिळू द्या की रं

मोर्चात सामील होऊ द्या की...


Rate this content
Log in