मोल संगीताचे
मोल संगीताचे
1 min
12.1K
मूल जन्म घेता रडे,
त्याचे ते पहिले गाणे,
हृदयाच्या स्पंदनात,
सुर लयाचे तराणे!
प्रिय कृष्णास बासरी,
राधा म्हणे ती सवत,
धुन मधुर ऐकता,
नाचू लागे नकळत!
पडघम मृदुंगाचा,
निनादतो मंदिरात!
शारदेची वीणा तार,
झंकारते अंतरात!
डग्गा तबल्याची जोडी,
तालवाद्य अभिजात,
पेटी बाजाची साथीला,
मैफिलीत, भजनात!
संगीताने तनातले,
सप्तचक्र समतोल,
साज छेडता सुरात,
होई जीवन अमोल
