मोकळा श्वास..!
मोकळा श्वास..!
1 min
207
मोकळा श्वास घेण्या मी बसले
डोंगर माथ्यावरी
भुर्र भुर्र वारा
स्पर्श करीत होता डोक्यावरी...
अवीट गोडीचा वात सुटला होता
बेधुंद बेफाम सुगंध घेऊनी
अंगावरचे वस्त्र वाऱ्यासवे
उडत होते मुक्त होऊनी....
अंगी तो भरत होता श्वास सुखाचा
मनोहर प्रियतम माझा होऊनी
काय सांगू त्या सुखाची महती
आठवण पुन्हा पुन्हा त्याची काढुनी...
दूर राहुनी तो चित्रकार
इस्टमन जॉन्सन पहात होता सारे
सहजी रेखाटले मज त्याने
मारुनी मुक्त रंगांचे फटकारे....!