मनोवस्था
मनोवस्था




बोलायचं होतं बरचं काही
पण वेळ मिळाला नाही
खूप साचलं होतं मनात
मांडायचं होतं शब्दात
भेटल्याशिवाय नाही करमत
वेळेचं गणित नाही जमत
लपवता येत नाहीत दाटून आलेल्या भावना
सांगता येत नाहीत होणाऱ्या यातना
कोणते मार्गही सापडत नाहीत
प्रश्नांची उत्तरेही मिळत नाहीत
काय करावे काहीच सुचत नाही
मज आता काहीच कसे उमजत नाही