Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Others

4.7  

Vimal Patkari

Others

मनोगत भारतमातेचे... !! ( काव्य )

मनोगत भारतमातेचे... !! ( काव्य )

2 mins
275


गुलामीच्या शृंखला तोडुनि 

स्वतंत्र केले मज सारे मिळुनी 

प्राण आपला हो त्यागुनी

राहिलेत किती अमर होवुनी !!

प्रसंगी नोकरीही लाथाडुनी 

सर्वस्वाचा त्याग करुनी

घर - संसारा तिलांजली देवुनी 

लढलेत तळहाती शीर घेवुनी!!

याची देही माझी काळजी

घेती माझे सुपुत्र आजही 

म्हणून स्वाभिमान आहे मनी 

असे मी हिरे-माणक्यांची धनी !!

आजही माझं लेकरु

घरापासून दूर दूर 

बायको - मुलांना सोडून

माझ्या जगण्यासाठी 

देतोय स्वत:ला झोकून !!

तो तिकडे सीमेवर लढतोय

म्हणून मी इथं सुखानं जगतेय 

अन इतर लेकरांनाही सुखात पाहतेय !!

आजही माझं लेकरु 

दिन-रात शेतात राबतय 

राब राब राबून घाम गाळतय 

माझ्या मुलभूत गरजांसाठी 

साऱ्याच प्रकारची पिकं पिकवतोय !!

तो काळ्या मातीत राबतोय 

म्हणून मी सुजलाम सुफलाम अशा 

समृद्धिचा ढेकर देतेय

अन इतर लेकरांनाही समाधानी बघतेय !!

अशी माझी ही दोन्ही लेकरं

जय जवान - जय किसान

शास्रीजींच्या या महान मंत्रास

जीवापाड जपतात !!

माझ्या लेकी -

अहिल्यादेवी,सावित्रीबाई,

हिरकणी,झाशीची राणी 

या आणि अशा अनेक माजी लेकींच्या 

प्रेरणेनेच आजची माझी लेक

सर्वच क्षेत्रात आहे अग्रेसर

हे सारं पाहून माझं मन 

खूप खूप सुखावतय!!

माझी काही लेकरं-

माझी काही लेकरंही खूप राबतात,

खूप धडपडतात,कमावतात 

पण ते स्वत:पुरतच पाहतात

कधी कधी स्वार्थासाठी आंधळे होवून

स्वत:चं अस्तित्वच गमावून बसतात

माणुसकी,नाती-गोती,रीत,प्रीत सारं विसरून

सर्वगुणसंपन्न अशी स्त्री-भ्रूण हत्या ,

दरोडा,अत्याचार,बलात्कार,भ्रष्टाचार अन निलाजरी लाच

अशा दुष्कृत्यांना खतपाणी घालत असतात

अन माणुसकीचा श्वास थांबवून एक दिवस 

कुठल्या ना कुठल्या जाळ्यात अडकून

नामोहरम होतात

 पण माझं काय ?

हे सारं पाहून माझ्या हृदयाची स्पंदनं कंप पावतात

अन जगण्याच्या भावना हेलकावे घेवू लागतात

पण बाळांनो काही हरकत नाही 

सुधारतील या चुकाही

नैतीकता,वात्सल्य,आपुलकी ,

सत्य,अहिंसा,शांती,

प्रामाणिकपणा,आत्मीयता,सहिष्णूता,

सृजनशीलता,स्वाभिमान,स्वदेशाभिमान

या सर्वच गुणांची पुनरावृत्ती होऊन 

' खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे '

असे साऱ्यांना सांगण्या येतील पांडूरंग साने !!

समता,बंधुता,एकता शिकवण देण्या जगाला

थोर महात्मा ज्योतिबा फुले

येतील परत जन्माला!!

मंत्र सत्य,अहिंसा,शांती

देण्या येतील पुनरपी गांधी 

सर्व धर्म समभाव घेवुनी 

येतील जन्मा छ्त्रपती शिवाजी !!

असेच अजुनही बरेच नेते

अवतरतील या भुमीवरुते !!

स्री सरस्वती सावित्रीबाई 

झाशीची राणी लक्ष्मीबाई 

मदर तेरेसा अन इंदिराजी गांधी 

या अन अशा अनेक पराक्रमी,

शौर्य,धैर्यवान विद्वान-विदुषिंची

प्रेरणादायी रुपं घेवुनी 

शूर,मुत्सद्दी,चतुर,हिमती 

आणिक हरहुन्नरी 

अशी गुणवान नररत्नांची खाण 

गवसणार मला हमखास 

मग मी होवून अधिकच 

सुजलाम-सुफलाम 

मनी धरून लेकरांचा स्वाभिमान 

डौलानं फडकणारा तिरंगा 

सन्मानांन पाहात राहणार !!


Rate this content
Log in