मन
मन
1 min
335
मनाचे व्यक्त रूप अबोल
उतरवले जाते कागदावर
राग, लोभ,प्रेम,मत्सर सारे
कोरले जाते या मनावर .....
शब्द मुके झाले बोलके आता
ठसा उमटवतात समाजावर
अनमोल विचारांचे होते कौतुक
बोल बोलले जातात अनुभवांवर....
दुखल्या मनाची सल रात्री एकांती
लेखणी हाती घेवून उतरवते डायरीवर
सुखाच्या क्षणांचे घोट रिते करते बर!
कुटुंबातील अबाल वृद्धां बरोबर.....
मन प्रत्येकाचेच सदा जपावे लागते
नको वाद,हवा फक्त सुसंवाद ओठी
सर्वाकडून मिळो कामाची पावती
नको प्रशंसा कधीच बाई खोटी.......