मकर संक्रांत
मकर संक्रांत
*भोगी* सणाला करूया
तीळ लावून भाकरी
*भोगी* आनंद खाण्याचा
भाजी संगे चव खरी ... १
*तीळ* स्नेहाचे प्रतीक
गाढ मैत्रीचे बंधन
*तीळ* गालावर दिसे
सौंदर्याचेही साधन ... २
*संक्रांत* सणाला सुरू
जाहले उत्तरायण
*संक्रांत* नको येऊदे
मिळूदे आनंद क्षण ... ३
*भेट* देऊया सख्यांना
हळदकुंक करूया
*भेट* घेऊ मैत्रिणींची
निम्मित्त हेच साधूया ... ४
*सुमन* देवू सखीला
हळदीकुंकू निम्मित्त
*सुमन* ठेवा नेहमी
शांत होईलच चित्त ... ५
.........................
*भोगी* ... सण , उपभोग
*तीळ* ... खाद्यपदार्थ , शरीरावरील खूण
*संक्रांत* ... सण , संकट
*भेट* ... नजराणा , भेटणे
*सुमन* ... फूल , चांगले मन