Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meena Kilawat

Romance

4.6  

Meena Kilawat

Romance

मिठी सैल झाली

मिठी सैल झाली

1 min
7.0K


माझ्या जीवनातले कोडे असे

मज अद्यापही सापडत नाही

कशी मिठी सैल झाली अशी

अजूनही मज उलगडत नाही..

गुलाबी मनाची स्थिती माझ्या

खऱ्या प्रेमाचे देवून हे दाखले

कधी काय होईल या जीवनी

मज प्रीतरंग अभिनय भासले.

प्रितिच्या बंधनातून हे आयुष्य

काढले अन् काळजाने ते वेढले

बंध नाजुक कोमल असतात

मनाच्या धाग्याने मी ते विणले.

चंचल नयनांचा भ्रम असतो

चचंल वलये ही आयुष्यात

मिठी असावी मजबूत नेहमी

त्यात असावी विश्वात्मक जीत.

सप्तरंगी रंगाच्या प्रितीची

अशीच असावी अदा न्यारी

जरी असली चौफेर वादळे

बांधुन मिठी चढावी पायरी.

डोळ्यातील पाणी आवरून

पापण्या आड ही लपवायची

प्रित ही प्रथम फुलवायची

मग सैल मिठी घट्ट विणायची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance