Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

मी मराठा, एक मराठा लाख मराठा

मी मराठा, एक मराठा लाख मराठा

1 min
314


जगणं माझ साधं, सिद्धहस्त

जणू संतवाणीतील हेतू शुद्ध

शिवराय फुले शाहू आंबेडकर

यांचे वारस आम्ही पाईक ही

मी मराठा, एक मराठा लाख मराठा


कळले मला कुणी नाही कुणाचा जरी

मिळून सारे खूप काही करू विधायक

सविनय चळवळ नेटाने चालवूया

माझ्या भविष्याचा मीच भाग्यविधाता

मी मराठा, एक मराठा लाख मराठा


अन्न, वस्त्र ना निवारा आता

रोजगार ना शिक्षणाचा पत्ता

सर्वच एकमेकांना समजून घेऊया

हिंदवी स्वराज्य सत्यात उतरुया 

मी मराठा, एक मराठा लाख मराठा 


नाही मजला कसले पूर्वग्रह,

घृणा, राग, द्वेष न कुणाचाही ठेवू

जाणीव मला मी जबाबदार भाऊ

चला, मिळुनी सारा देश घडवू

मी मराठा, एक मराठा लाख मराठा


Rate this content
Log in