Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SANJAY SALVI

Others

3.0  

SANJAY SALVI

Others

मी असे का ?? मी असे का ??

मी असे का ?? मी असे का ??

1 min
393


मी असे मुकाट्याने का म्हणून जगायचे,

माझेच जगणे  असे व्यर्थ का दवडायचे??

सूर जगण्याचे मला न जरी गवसले,

माझेच गाणे मी आता का न गायचे

माझेच जगणे  असे व्यर्थ का दवडायचे??

डोळ्यातील भावना माझ्या न कोणी पाहिल्या,

हृदयातील  यातना माझ्या न कोणी जाणल्या,

दुसऱ्यांच्या  यातनांना का समजून घ्यायचे,

माझेच जगणे  असे व्यर्थ का दवडायचे??

क्षणो क्षणी मरण माझे मी यथेच्छ  भोगले,

अन शेवटी जगण्याचे मी मनासी योजिले ,

भोगलेल्या मरणाला का मिठीत घ्यायचे,

माझेच जगणे  असे व्यर्थ का दवडायचे??


Rate this content
Log in