महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा,
कसा असावा ऐका जनहो,
स्वप्नातला महाराष्ट्र माझा.
नसावा कुणी दीन दुबळा
नसावा कुणी लाचार,
असाव्या सुरक्षित लेकी सुना,
ना व्हावा कधी अत्याचार.
असावे राष्ट्र माझे साक्षर,
न राहो कुणी अडाणी,
द्यावी भक्कम साथ एकमेका,
येता काही आणीबाणी.
मातृपितृ प्रेमाचा इथे,
वाहतो अखंड झरा,
अनाथ आणि वृद्धाश्रमाना,
कधीही नसावा थारा.
माझ्या महाराष्ट्रातील जनतेला,
मिळावी प्रेरणा आणि स्फूर्ती,
विविधांगी कलागुनांनी,
वाढावी अविरत सदा कीर्ती.
स्वप्नातला महाराष्ट्र माझा,
असावा आधुनिकतेने परिपूर्ण,
मिळावा रंजल्या गांजल्यासी आधार,
व्हावे राष्ट्र सुखी,समृद्ध आणि संपन्न.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩