महालक्ष्मी पूजन ज्येष्ठा गौरी
महालक्ष्मी पूजन ज्येष्ठा गौरी
*महालक्ष्मी पूजन ज्येष्ठा गौरी*
गौराई माता तू ये माझ्या घरी,
चांदण्या पावलांनी ये सखी सुरी।
शालू-चोळी सोन्याची हार नेसून,
सुगंधी फुलांची वेणी नटून।
रत्नहार शोभतो तुझे गळ्यात,
आभाळ कुकुवाचे कपाळात।
हातात हिरवे बांगड्यांचे गडे,
पायात पैंजण चांदीचे तोडे।
तुझ्या दर्शनाने सुख समृद्ध होईल,
सत्य-शांती सुख घरी नांदेल।
भाज्यांची गोडी, आबिल गोंदिल,
तुला नैवेद्य भावे अर्पण करील।
सासरी जाऊन सगळ्यांना वरदान दे,
माहेरी येऊन आनंद लाभ देइ।
वर्षावर्षी तुझा उत्सव घरोघरी,
महालक्ष्मी, तुला कोटी कोटी नमस्कार करी।
स्नेह, समृद्धी, शांती आणि नवचैतन्य
देवा घरात वसतुं सुखात नित्य।
तुझ्या कृपेमुळे घर विसावेल,
महालक्ष्मी, घराचे मंगल वाढलेलं।
🖊️
कवी - ज्ञानेश्वर आल्हाट
९६७३१५८३४३
पुसद
