Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रसाद फर्डे

Others

2.5  

प्रसाद फर्डे

Others

मेणबत्ती

मेणबत्ती

1 min
364


किती दिवस आम्ही फक्त इथं

मेणबत्त्या जाळणार आहोत

रोज नवीन एका निर्भयासाठी

काळा दिवस पाळणार आहोत.....


वासनेने भरलेले हे लांडगे

रस्त्यारस्त्यावर फिरताना दिसतंच राहतील

म्हणून काय आता महिलांनी

बाहेर पडायचं सोडायचं आहे का ?

शिक्षण , नोकरी सोडून देऊन

पुन्हा चूल आणि मूल पाहायचं आहे का ?

राम, लक्ष्मण,अभिमन्यूच्या

गोष्टी सांगून, जिजाऊंनी शिवबा घडवला

त्या शिवबाचा इतिहास आम्हाला तोंडपाठ आहे

मग शिवबाने नराधमांना कडेलोटात चिरडून टाकले

मग आम्ही कधी ह्यांची

पाठ सोलणार आहोत...

की आम्ही फक्त इथं मेणबत्त्या जाळणार आहोत


सौंदर्य हा स्त्री चा दागिना समजला जातो

तोच दागिना तिचा आज वैरी बनला आहे

म्हणून काय तिने आता स्वतःला कोंडून ठेवायचे आहे ?

की, ह्या लफग्यांपासून वाचण्यासाठी

स्वतःला कुरूप करून घ्यायचे आहे का?

ती सुभेदाराची सून ही होती ना लावण्यवती

तिच्याही नाजूक अंगावर शोभत होते माणिक मोती

सर्व इतिहास आम्हाला जसाच्या तसा माहीत आहे

मग कधी आम्ही परस्त्रीला

माता बोलणार आहोत..

की आम्ही फक्त इथं मेणबत्त्या जाळणार आहोत


Rate this content
Log in

More marathi poem from प्रसाद फर्डे