मेघराजा
मेघराजा
*दाटून आले नभ गगनी*
*आशा झाल्या पल्लवित*
*बरसणार मृग जोरात यंदा*
*बळीराजा झाला आनंदीत*
*काळीपांढरी झालर मेघांची*
*शोभून दिसे आकाशात*
*आनंदाला उधाण आले*
*पेरणी होणार जोरात*
*सजीवसृष्टीचा मिळणार चैतन्य*
*पावसाच्या बरसण्याने*
*झाली तयारी पूर्वकार्याची*
*सुखद भविष्याच्या वेधाने*
*आनंदाने नाचूगाऊ लागले*
*मोर लांडोर पशूपक्षी*
*दिवस आले लगबगीचे*
*वेळ नाही घेण्या वामकुक्षी*
*करतो मी मनोमन प्रार्थना*
*आज वरूणराजास कळकळीने*
*बरस जोमाने या वर्षी*
*शिवार भरू दे सोन्याने*