मधूगंध
मधूगंध
1 min
7.0K
मोहरलेल्या फुलांचा,
वेणीत मळलेला।
बहरलेल्या फुलांचा,
गजरा सुकून गेला।।
मनात भावनांचा,
कल्लोळ चाललेला।
डोळ्याचे आसवांचा,
महापूर दाटलेला।।
लग्नात मळलेला,
गजरा अजून ओला।
जणू मातीत पावसाने,
मधूगंध सांडलेला।।