मध ओठांवरचे
मध ओठांवरचे
धुंद तुझ्या मिठीत, काही क्षण गोवलेले,
मध ओठांवरचे, नकळत चोरलेले||धृ||
प्रीत वल्लरीवर, जे फुल उमललेले,
आठवते मजला, हृदयात जपलेले,
चंद्राने तारकेला, क्षितिजी खुलवलेले,
मध ओठांवरचे, नकळत चोरलेले||१||
स्वप्न खगांचे पंख, अथांग पसरलेले,
आतुरल्या सांजेचे, सारंग विखुरलेले,
साकीने यौवनाचे, मद प्याले भरलेले,
मध ओठांवरचे, नकळत चोरलेले||२||
इंद्रधनु दवांचे, मोती बहु पेरलेले,
प्रेम ओल्या मातीच्या, मृद्गंधात भिजलेले,
अनिलाच्या स्पर्शाने, हळूवार झरलेले,
मध ओठांवरचे, नकळत चोरलेले||३||