Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shakil Jafari

Tragedy Others

4.3  

Shakil Jafari

Tragedy Others

मौन पाळतो

मौन पाळतो

1 min
11.4K


विरहात अश्रू मी

रात्र दिवस गाळतो

थेंब थेंब रक्त माझा

आसवात ढाळतो !!

माझ्या अवती भोवती नेहमी

असतो दुःखाचा सुगंध

तू दिलेल्या जखमांना

उकरूनी गंधाळतो !!

साध्य मला होत नाही

स्वतःला सांभाळणे

आहे मी भावूक म्हणूनी

भेटणे तुला टाळतो !!

तुझ्या सारखे विसरणे

शक्य न झाले मला

करुनी आठवण तुझी

मी तना मनाला जाळतो !!

तुझ्या बदनामीची भीती

मूक बनविते मला

लाख प्रश्न लोक पुसतात

मौन पाळतो !


Rate this content
Log in