मैत्री...!
मैत्री...!




मैत्री शाळेतली
म्हणजे दगडावरची रेघ
आठवण काढता
दाटून येतो स्नेहाचा मेघ....
या मेघामध्ये
वीज चमकवीते ती हसरी परी
लहानपणीची ती राणी
असायची नीटनेटकी वेणीफणी....
मोती सांडून, थोडे भांडून
गंगा यमुना यायच्या भेटीला
माझ्याविन कोणी वालीच नव्हते
त्या अल्लड प्रेमळ नकटीला....!