मातीचे पांग फेडले मी प्रिये...
मातीचे पांग फेडले मी प्रिये...


आज मातीस या मी,
रक्त माझे अर्पिले गं,
मुक्त मी व्हावया,
मातेचे पांग फेडीले गं...
भार मनी जाणितो गं,
भेट पुन्हा होणार नाही,
वाट नको बघू सखे,
आता देशाचा शहीद मी...
माफ कर चूक-भूल,
आपल्या आठवणीतील,
नको आसवे डोळ्यांत तुझ्या,
नको यातना जगण्यातील...
दुःख फक्त एवढेच गं,
सांगून नाही चाललो मी,
मनी राग नको माझा,
वचन दे, राहशील सुखी...