Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

मानव जीवन

मानव जीवन

1 min
344


असे  जगावे जीवन

भल्या माणसा सारखे

तुम्ही गेल्यावर जग

व्हावे प्रेमाला पारखे ।।१।।


श्रेष्ठ जन्म माणसाचा

नाही सहज मिळत

लक्ष चौऱ्याऐंशी योनी

यावे लागती फिरत ।।२।।


द्वेष मत्सराचा अंश

ठेऊ नये जीवनात

दया प्रेम भाव सदा

असू द्यावा हृदयात ।।३।।


दोन दिसाचा पाहुणा

देह सोडून जायचे

कुणा संगे भांडू नये

जिव्हाळ्याने रहायचे ।।४।।


असे जगावे जीवन

कर्म चांगले करावे

गर्जाव्यात दशदिशा

कीर्ती रूपाने उरावे ।।५।।


जीवनात संकटांची

फौज यावया लाजावी

सौख्य समृद्धी शांतता

सदा जीवनी लाभावी ।।६।।


Rate this content
Log in