माणुसकीने वाग रे
माणुसकीने वाग रे
माना मानव हीच जात
मानवता हाची धर्म
नसे उच नीच कोणी
यातच जीवनाचे मर्म
पृथ्वी माता मानताच
आपण सारे बांधव रे
वि श्व बंधुत्वाची भावना
माणुसकीने वाग रे
देवास नसती कोणी लहान
सूर्य देतो प्रकाश एक समान
तूही न करीता दुजाभाव
माणुसकीला दे सदा मान
जतन करू संस्काराची पुंजी
भुकेलेल्या अन्न देणे
उजवा हात दुखावता
डाव्या हाताने पुढे येणे
गंगा जळ पाजले मुक प्राण्यास
संताची हीच आहे शिकवण
भुत दयेची तयांना जाणीव
सदा मनी ठेवू तीच आठवण