Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

माणसांचा स्वार्थीपणा

माणसांचा स्वार्थीपणा

1 min
97


कोणी म्हणतो जय शिवराय

कोणी म्हणतो जय मल्हार,

कोणी म्हणतो जय भीम

कोणी म्हणतो जय अण्णा...

किती हा माणसांचा स्वार्थीपणा,

नसतो जात,पात, धर्म महामानवांना...


नेते, रंग, झेंडे कसे

 वाटून हे घेतले ?

समाजाचे केले तुकडे 

कसे तुम्हा पटले?

करून भेदभाव सांगा

काय तुम्हा भेटले?

स्वतःचाच डंका वाजवीत

मिरवीत काय सुटले ?

म्हणावे कसा माणूस अशा माणसांना ...

नसतो जात, पात, धर्म महामानवांना....


नाही कळली कुणा

महामानवांची शिकवण,

स्वप्न त्यांचे होते

जगाचे कल्याण,

कुण्या देवाने केले

जात,पात, धर्म निर्माण?

मानवाने करावे

मानवता जतन

अर्पिला देह त्यांनी जगाच्या कल्याणा...

नसतो जात, पात, धर्म महामानवांना...


समता, बंधुता हवी

सर्व सुखी असावेत,

नको मुळीच भेदभाव

लाचार, दुःखी नसावेत ,

सदाचार, सद्वर्तन हवे

दानव नसावेत,

माणसात गुण

माणसाचे असावेत

वंदू या सारे आदर्श महापुरुषांना ...

नसतो जात, पात, धर्म महामानवांना...


समाजासाठी ज्यांनी

 वेचले, आयुष्य सारे,

विचार, कार्य, स्वप्न 

त्यांचे समजून घ्या रे.

दुष्टांचा करा नायनाट

सारेच एक व्हा रे,

व्हा वाली दिनाचा

जगा नी जगू द्या रे.

व्हावे जगाचे कल्याण हीच प्रार्थना...

नसतो जात, पात, धर्म महामानवांना....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract