माझं प्रेम
माझं प्रेम
अस म्हणतात प्रेम
हृदयातूनच असावं,
दोन जीवांना एकाच
बंधनातून बांधाव
प्रेमाला नसते सीमा
अबोल माझ्या भावना,
नजरेत व्यक्त झाल्या
अंतरीच्या या वेदना
माझे प्रेम तुझ्यासाठी
रोमारोमात भरले,
आठवणींच्या रानात
मनही गहिवरले
जीव माझा तुझ्यासाठी
कसा वेडापिसा झाला,
प्रिये तुझ्या प्रेमासाठी
शब्दांचा भाव मांडला..!