Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Umesh Dhaske

Inspirational

3  

Umesh Dhaske

Inspirational

माझी मराठी..

माझी मराठी..

1 min
163


माय मराठी मराठी

सडा अहिराणीचा अंगणी

वर्‍हाडीची फुले शोभे

माझ्या मराठीच्या ठायी...


माझी मराठी कोकणी

शहाळावाणी ही मधाळ

अमृताची वाणी गोड

जशी आंबा हा रसाळ....


माझी मराठी रांगडी

माटी केसरीच्या भाळी

विजयाचा मानकरी

माझा पैलवान मराठी...


माझी मराठी खेळात

गाण्यात ही सजते मराठी

नृत्याविष्काराची मराठी

कलाकुसरीत मराठी...


पैठणीत शोभते गं

माझी शृंगारी मराठी

गोडधोड रांधते गं 

माझी मधुर मराठी....


माझी मराठी मराठी

चराचरात सजली

माझी मराठी मराठी

कणाकणांत भिजली.....


जपू मराठीचे बोल

अंगाई गोडगाणी

आठवणींत राहिल

माझी सोज्ज्वळ मराठी....!


Rate this content
Log in