Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Padmakar Bhave

Others

4.7  

Padmakar Bhave

Others

माझी मराठी

माझी मराठी

1 min
334


जशी निरांजनाची वात

आणि उजेड देवघरात

तशी मायमराठी रहावी

तेवत ह्या हृदयात


जणू तुळस पतित पावन

माझिया घरी दरवळते

ही माय मराठी तैसी

हे अंतर्मन उजळवते


माझिया मनीचा श्वास

तो होतो माझे जगणे

तोवरी निनादात राहो

हे माय मराठी गाणे


शिरताच आईच्या कुशीत

लेकरू जसे विसावी

ती ममता शब्दांमधुनी

मम अंतर्मनी रुजावी


ज्ञानेश्वर स्पर्शीले जीला

जीने रचिली तुकया गाथा

जिथे कितीक सारस्वतांनी

आदरे झुकविला माथा


मी कोण कुठला पामर

मी रचितो काय(?)येथे

ह्या बडबड गीतांमध्ये

हि माय प्राण फुंकते


तो सुदिन लवकर येवो

प्राण होण्याआधी मलूल

अभिजात मराठी स्वप्न

स्वप्नांचे व्हावे फूल...


Rate this content
Log in