माझे पंख
माझे पंख
उंच होते उडायची मला
पंख पसरून आकाशात,
वाट मोकळी मनाची
भरारी घेण्यास गगनात. ....१
गिरक्या मारत फिरणे
हवे बरोबर वाहने,
खाली जमिनीवर पाहता
माझे उपभोगणे. ....२
नको पिंजरा कैदीचा
स्वातंत्र्य हवे मनाचा,
विचार माझे उंच उडतील
जर तोडेन बंध समाजाचा. ....३
शक्य होईल उडणे मला
भेटेल दिलासा आपल्यांचा,
खरंच घेईन उंच भरारी
जर हात मिळेल सगळ्यांचा. ....४