Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

माझे पहिले प्रेम

माझे पहिले प्रेम

1 min
124


माझं पहिलं प्रेम नेहमीच

माझ्याच पहिल्या कवितेवर |

लेखनीस प्रोत्साहित करणा-या

अप्रकाशित त्या ज्ञान सवितेवर | |१| |


पहिलं प्रेम हे कधी नाहीच

विसरता येत हे अगदीच खरे |

माझ्या ह्या कवितेची कहाणी

मी तरी कशी विसरेन बरे? | |२| |


प्रेमात पडलं की वेडं व्हायला होतं

सा-यांनाच सुचत नाही काहीच |

तसंच झालं माझं मी आजही वेडी

मला गर्व ती कविता माझीच | |३| |


माझी पहिली कविता मला कायम 

नेते बालपणीच्या आठवणीत |

आठवते इन्स्पेक्शनच्या दिवशीची

फजिती आमची साठवणीत | |४| |


माझ्या पहिल्या कवितेनं दिलंय

मला साहित्याचे नवेच दालन |

तिच्याच मुळे लिहायला शिकले

मी करीत सर्व नियमांचे पालन | |५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract