माझा राया पंढरीचा
माझा राया पंढरीचा
माझा राया पंढरीच्या
अरे सावळ्या विठ्ठला
भक्तासाठी विटेवरी
बघा प्रसन्न जाहला.
पुंडलिका भेटण्याला
परब्रह्म प्रगटला
युगे अठ्ठावीस तिथे
फक्त भेटण्या थांबला.
रूप साजिरे गोजिरे
छान कासे पितांबर
तुळशीच्या माळा गळी
दिसे ध्यान ते सुंदर.
रूप पाहता लोचनी
होई सार्थक जिवाचे
ताण शीण सकलांचा
दूर होई त्या भक्तांचे.
यात्रा आषाढी कार्तिकी
दिंडी पताका निघती
गाती नाचती आनंदे
विठू गजर करती.