Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

लेखणीचा आधार

लेखणीचा आधार

1 min
185


जेव्हा मन होते उदास

तेव्हा आधार तुझा असतो,

जीवनाच्या ह्या कोऱ्या कागदाला

लेखणीचा तेवढा गंध राहातो...

उदास असलेल्या निवांत क्षणाला

तुझ्या शब्दांचा आधार असतो,

जीवनाच्या माझ्या डोलत्या लाटेवर

मला किनारा मोकळा मिळतो...

मंद मंद वाऱ्याच्या झुळूकेवरती

सुगंधित पक्षी सैरभैर डोलतो,

माझ्या ह्या भिरभिरत्या सरींमध्ये

भावनांचा सतत पाऊस पडतो...

वाहणाऱ्या डोळ्यांना माझ्या हा

श्रावण बघा मिठीत धरतो,

अन् भिजलेल्या मनाला माझ्या

आधार मला लेखाणीचाच मिळतो...


Rate this content
Log in