लेखणी
लेखणी
1 min
340
लेखणी माझी
अशी असावी
वाचणाऱ्यांना
मोहित करावी
लेखणीचा पडतो
प्रभाव भारी
मनातल्या भावना
उतरतात सारी
प्रकट होत नाही
मनातले विचार
लेखनीमुळे मिळतो
नवीन आकार
विविध प्रश्न जेव्हा
मनात करतात घर
हळूच कागदावर
उतरते मोत्यांची सर
एकामागून एक
सुटत जातो गुंता
मोत्यांची बनते
मग सुंदर कविता
अशीच गुंफत रहावी
कधीही थांबेना
सदैव लेखणी चालावी
हिच मनी कामना