Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Meenakshi Kilawat

Tragedy

2  

Meenakshi Kilawat

Tragedy

कविता

कविता

1 min
487


  "स्त्रीलाच सारा पोळतो का"?


स्वार्थ भरला या जगी

स्त्रीलाच सारा पोळतो का?

देशसेवेच्या पथावरुनी पाय धरुनी

असा ओढतो का?।।


दाट येथे धूर येतो 

काळजाला भेदतो का?

आसवांचा लोट वाहे 

कोळश्याला झेलतो का?।।


फुल राहतो एकटा पण

पक्षी हा चोचिने तो टोचतो का?

पाखरांना जीव तेंव्हा कश्याला

आपण लावतो का?।।

 

दुःख आता सोसण्याला 

धाव कोठे घेतली तू 

जीवनाला वाचवाया 

अंधश्रद्धा मानतो का ?।।


संशयाची धूळ डोळी

कोणती ही राजनीती 

दूटप्पी ही धोरणे मग

संघवेत्ता पाळतो का ?।।



Rate this content
Log in