कविता -असा आहे माझा खरा देश
कविता -असा आहे माझा खरा देश
1 min
302
प्राचीन संस्कृती जोपासतो आम्ही
अनेकतेत असे एकता असा हा देश
नाना प्रांत, विभिन्न भाषा ,परिवेश
असा आहे खरा माझा भारत देश...
नव्या युगात केलीय अफाट प्रगती
तरी जपतो परंपरा ,नि चालीरीती
ग्रामीण जनजीवन ,ग्राम्य हा देश
असा आहे खरा माझा भारत देश
गोधन, पशुधन, लोकधन हे सारे
लोकजीवनात जपतो हे आम्ही सारे
चला खेड्याकडे हाच देतो संदेश
ग्रामीण जीवनात पहा भारत देश