Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sanjay Gurav

Inspirational


3  

Sanjay Gurav

Inspirational


कुठे गेले समाधान?

कुठे गेले समाधान?

1 min 221 1 min 221

शोधात उत्तरांच्या चालू

रोजचेच रे घमासान

चिंतेची सुरकुती गाली

कुठे गेले समाधान ?


धावतो पुढे पुढे सारखा

सुखनिद्रेला परी पारखा

विणतो दुःख एकसारखा

माणूस गोतावळ्यात पोरका.


मिळवितो पण पुरत नाही

मालिका हव्याची सरत नाही

सरले जिणे प्रश्नांमागे तरी

नक्की काहीच ठरत नाही.


अनंते ठेविले राहू नये तसेच

चित्ती समाधान ठेवावे तरी

सुखाचे एक बीज पेरुन पाहा

ओंजळ समाधाने "तो" भरी.


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjay Gurav

Similar marathi poem from Inspirational