Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Deore Vaishali

Fantasy

3  

Deore Vaishali

Fantasy

कुणीतरी असावं

कुणीतरी असावं

1 min
398


जीवनात कुणीतरी असावं आपलं मन जपणार,

समजून घेणार भरभरून आनंद देणारं....

हसताना हसणार,

रडतांना अश्रू पुसणार,

सूर बनून जीवनात,

गीत सोबत गाणार...... 

जीवनात कुणीतरी असावं आपलं मन जपणार....


दु:खात धावुन येणार,

चांगल्या कर्माचा कौतुक करणार,

चुकीच्या वेळी हक्काने

वेळीच रागावणार.,

जीवनात कुणीतरी असावं आपलं मन जपणार...


चिंतेत असतांना आधार देणारं,

भरून आलं मन तर मायेचा हात फिरवणार,

थकलेल्या जीवाला मांडीवर थोपटणार,

रागात असताना हळुच हसवणार,

जीवनात कुणीतरी असावं आपलं मन जपणार..


तनामनाला साथ देणार,

आपल्या आनंदातही आनंदी होणार,

जगाची पर्वा न करता सोबतीला असणार

दुःखात आपला खांदा बनणार..

जीवनात कुणीतरी असावं आपलं मन जपणार..


Rate this content
Log in