Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Ramkrishna Nagargoje

Romance

3  

Ramkrishna Nagargoje

Romance

कटी लागे केशभार.

कटी लागे केशभार.

1 min
341


जे बोलताही येत नाही, 

ते सांगताही येत नाही,

मनात धरून, ठेवताही 

येत नाही, ते प्रेम,  

मला तुझं, तुझं मला, 

कागदावर कविता रूपाने

सांगता येईल का ? सखी, 

सांग ना, सांगता येईल? 


आता हे बघ, आपण, 

आहोत दोन व्यक्ती, 

दोन मनाला दोन विचार, 

कधी पडते गालावर खळी, 

अन कधी वाहतात अश्रू, 

म्हणून आपलं प्रेमच नाही, 

सांगता येईल का ? सखी, 

सांग ना, सांगता येईल? 


तुझे कळीसारखे बोटं 

आणि मृगासारखे नयन, 

उजळ हसरा चेहरा,  

कटी लागे केशभार, 

म्हणून मला सांगता येईल 

का ? सखी,

कटी केशभार आहे, 

सांगता येईल का,सखी, 

सांग ना ? सांगता येईल? 


आपण लग्नाआधी, 

एकदाच भेटलो, 

नव्हता मोबाईल, 

नव्हती बाग 

आपण भेटलो बाहुल्यावर, 

तेथे बांधली लग्नगाठ,

जरी नव्हता हनिमून, 

तरी होती गोड पहाट,

म्हणून सांगता येईल का, 

सखी कशी होती, 

पहिली रात.

सांगता येईल का,सखी, 

सांग ना ? सांगता येईल?


कधी डोळे भरतात, 

कधी हसतात कसे, 

शुभ्र दातावर अहम, 

दाखवणारे, 

आज जरा लपवून, 

घेतलंय त्यांनी, 

दोन भिगांच्या काचेत, 

प्रेम तितकंच आहे, 

काळजी घेणारं, 

सांग ना ते, 

त्याच अंगीचं मोठेपण

दाखवता येईल का,? 

सांगता येईल का,सखी, 

सांग ना ? सांगता येईल?


Rate this content
Log in