क्षण
क्षण
तुजविन माझं कुठे लागेना मन
कसा साजरा करू मी प्रेमाचा सण....
रडून रडून माझे डोळे ओले झाले
सुख सोडून दुःख का नशिबी आले
प्रेमाचे माझ्या कुठे कसे हरवले क्षण....
तुझ्या आठवणींसोबत मी केलं लग्न
तू आज आहे कोणाच्या संसारात मग्न
तुझ्या प्रेमाचा मला सापडत नाही कण....
माझे लिहिले होते तुझ्या सोबत संजोग
आज कुठे लावला माझ्या प्रेमाचा भोग
मी आहे एकटा तुझ्यासोबत किती जण.....