Pallavi Udhoji

Romance


3  

Pallavi Udhoji

Romance


क्षितिजापलीकडे

क्षितिजापलीकडे

1 min 906 1 min 906

मागणे माझे एकच होते 

सहवास मला तिचा हवा होता 

मला तिच्यासाठी पंख नवे हवे होते 

सोबत घेऊन या क्षितिजापलीकडे 


मनातले सगळे किल्मिष दूर करुनि

सोबत दे सखी मला घे जवळी 

आस तुझी मला दे जीवा 

साथ तुझी मला दे जन्मोजन्मी


होकार तुझा येता जीव होतो वेडापिसा

तुझी लाजलेली नजर साथ देईल प्रेमाला माझ्या


तुझ्या गालावरची खळी 

घायाळ करते मला 

अलगद तुझ्या स्पर्शाने 

गदगद झाला जीव माझा


Rate this content
Log in

More marathi poem from Pallavi Udhoji

Similar marathi poem from Romance