क्षितीज
क्षितीज
पाहतो आकाशाला
वाटते टेकले भूमीला
भास होतो मनाला
अजूनही हळवं मन घेतंय शोध
विज्ञानाचं शिकवतंय बोध
पाहता त्याकडे अजूनही लागते वेध
अनोखी त्याची किमया
आढळून येते पृथ्वी आणि अवकाशाची माया
पाहतो तेव्हा प्रत्येक समया
क्षितीजच देते जगण्याची आशा
दूर करते निरागस मनाची निराशा
खरोखरंच अनोखीच आहे त्याची नशा
नटवते आख्ख्या सृष्टीला
प्रेरित करते सर्वाला
क्षितीजच भासते प्रत्येक मनाला