कसे सांगू मी आज...
कसे सांगू मी आज...
प्रिये, सांत्वनासाठी मिठीत घेता मजला
सावरणारे तुझे शब्द सहजीवनी ऐकायचे
येणारे, जाणारे क्षणिक क्षण न विसरता
फक्त तुझ्यासाठी सदैव ते आठवायचे
आपल्याला आयुष्यभर जगता येतील
आस अशा सहवासाच्या त्यागपत्राची
सखे, मनातले तुला कसे सांगू मी आज
साथ तुझी सावलीसारखी हवी कायमची