" कृपा "
" कृपा "
1 min
126
कष्ट करूनी कपाळी घामाचे थेंब
ढबढबूण काम कष्ट उपसूनी
माय,बाप,बायको लेकरू
जबाबदारी पाळत अनंत
अडचणी पार करत कष्ट
रेटत रेटत आजचा दिस येईल
चांगला ,या आशा मनाशी
बांधूनी कष्ट मनाशी ठरवूनी
शरीर दिले झोकूनी
हीच परमेश्वरी परीक्षा
तोही बघत आपला भक्त
श्रध्देने प्रामाणिक
कष्टे च्या सामोरी जावूनी
आपल्या ध्येया साठी
कटिबंध अशाच भक्ता च्या
पाठी माऊली चा 'कृपाछञ'..........!