करीतो प्रणाम...
करीतो प्रणाम...
करीतो त्यांना प्रणाम...
ज्यांनी ज्यांनी तुजसाठी दिले आहे बलिदान
करीतो त्यांना प्रणाम देशा करीतो त्यांना प्रणाम...
कोणी झेलला तुरुंगवास
गोळा झेलल्या छातीवरती,
रणांगणावर रक्त सांडले
हासत गेले फासांवरती.
सर्वस्व अर्पिले ज्यांनी गातो त्यांचे गुणगान...
देशासाठी जे जन्मा आले
अजरामर ते झाले बरे
जगले मेले देशासाठी
देशभक्त ते झाले खरे.
अशे हुतात्मे होऊन गेले, किर्तीने जे महान...
सूवर्णाक्षरांत ज्यांचे नाव
इतिहासाच्या आहे पानावर,
संस्कार त्यातून टाकले जातात
आज आमच्या बालमनावर
करताना जयघोष त्यांचा वाटे आम्हा अभिमान...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
