Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

कोरोनाला हारवू या

कोरोनाला हारवू या

1 min
190


कोरोना कोरोना कोरोना कोरोना

आपण त्याला सारेजण हारवू या ना......


गेल्या वर्षी ओळख झाली कोरोनाची

सवय झाली मुलांना शाळा नसण्याची...


या वर्षी कोरोनाची दुसरी लाट आली

मानवाला फारच त्रासात टाकत चालली....


मानव मानव भेटू शकत नाही आता

लांबूनच बघा सार्‍यांना नाही या बाता...


मास्क लावा सतत बाहेर जाताना

सॅनिटायजर लावा सांभाळून हातांना...


कोरोना योद्धा पेशंटची काळजी घेतात

स्वतःच्या कुटूंबापासून लांबच राहतात..


आता मात्र सारेच हतबल झालेत

ऑक्सीजनही कमी पडू हो लागलेत....


नका होवू अहो हतबल तुम्ही सारे

सांभाळू आपण आपले वृद्ध सान तारे...


शासनाचे निर्बंध चोख आपण पाळूयात

कोरोना योद्धांनाही जमेल तशी मदत करूयात...


चला हरवू या कोरोनाला वसुधेवरून

मास्क वापरून, शासनाचे नियम पाळून...


Rate this content
Log in