Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others

4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others

कोरोना

कोरोना

1 min
253


कोरोनाने कमाल केली 

सारी दुनिया त्रस्त झाली 

काय आजार हा आला 

मानव हतबल त्याने केला 


सारे जग संकटाच्या खाईत 

नातेगोते विचारीना त्यात 

जो तो आपला विचार करतो 

कोरोना भितीने जीव घाबरतो 


सारी दैना जगाची उडविली 

भल्याभल्यांची त्याने जिरवली 

अहंकार,न्यूनगंड त्याने संपवला 

मानवतेचा धडा शिकविला 


गोरगरीबांचे हाल खूप झाले 

उपासमारीने जीवन भयान जगले 

माणूसकीने हृदय हेलावले 

अन्नदानासाठी हात सरसावले 


नात्यागोत्यांची भांडणे झाली 

भावाभावात वाटणी झाली 

गावात विचारीना कुणी कुणाला 

रक्तातच अस्पृश्यतेचा विटाळ झाला 


कोरोना आजार भयंकर 

दुर्लक्ष्य केल्यावर नाही सोडणार

तोंडाला मास्क गर्दीत लावावे 

कोरोना विषाणूला पळवावे 


कामधंदा होईल सुरळीत 

लस कोरोनाची आहे सुरक्षित 

बळी पडू नका अपप्रचारास 

आमंत्रण नको पुन्हा संकटास 


आपल्यामुळे नको कुणाला त्रास 

लग्न,वाढदिवस,टाळावे हमखास 

सुरक्षित अंतराचे पाळावे नियम 

वाढवावे त्यातूनच खरे मानवप्रेम


Rate this content
Log in