Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swapna Wankhade

Others

3  

Swapna Wankhade

Others

कोरोना एक विपत्ती

कोरोना एक विपत्ती

1 min
266


व्यस्त होतो आपण सर्वजण

आयुष्याच्या दैनंदिन व्यापाने

खडबडून जागे झालो सगळे

कोरोना विषाणूच्या तापाने


सगळी श्वसन यंत्रणा ग्रासतो

घेऊ देत नाही मोकळा श्वास

कुणास ठाऊक घेईल कुणाचा

येणारा काळ निर्घृणपणे घास


दृष्टीस नं दिसणाऱ्या शत्रूमुळे

सर्व जग अचानकपणे थांबले

प्रदुषण प्रचंड प्रमाणात घटले

हे झाले त्यातल्या त्यात चांगले


कोण श्रीमंत वा गरीब आहे?

कोणाकडे आहे किती संपत्ती

त्याच्या पुढे सर्व समान आहेत

कोणावरही येऊ शकते विपत्ती


आपल्या सोयीसाठी आपण

इतर प्राणीमात्रांना दुखावले

स्वच्छंद विहार करीत आहेत 

ते काही दिवसांकरिता सुखावले


सर्व जगाला व्यापले आहे त्याने

मोठा आहे परीघ आणि व्याप्ती

तोच या अग्निदिवयातून वाचेल

ज्यात असेल रोगप्रतिकारक शक्ती


अवघे जग ढवळून निघेल

मानवाला बसेल त्याची धग

सगळे शांत झाल्यावर दिसेल

अगदी बदललेले नवे जग


Rate this content
Log in