कोणीतरी तुमच्यासाठी
कोणीतरी तुमच्यासाठी
1 min
180
कोणीतरी तुमच्यासाठी
जगणारं असावं
कोणीतरी तुमचं भलं
बघणारं असावं || 0 ||
एकटं जगण्यात
काय मजा आहे
खरं तर एकटेपणा
क्रूर सजा आहे
कोणीतरी तुम्हाला
बिलगणारं असावं
कोणीतरी तुमचं भलं
बघणारं असावं || 1 ||