कोण मनात माझ्या..!
कोण मनात माझ्या..!


हा बेभान होऊन वाहणारा वारा
त्यात पक्ष्यांचा किलबिलाट
त्यातून खिडकीतून बाहेर भिरभिरणारी नजर
डोळेझाक न करता अगदी एकटक..!
बघता बघता निरभ्र आकाश काळेकुट्ट
आठवणीची लहर आली होती
त्यात विजांचा कडकडाट,
मोकाट सुटलेला पाऊस
फक्त बसरत होता मनसोक्त
सुकलेल्या मातीत चिखल साचेल इतका
आडोशाला उभी राहून
मी सगळंच न्याहाळत होते
कोण माझ्या मनात
याचे उत्तर शोधत होते..!