कोडं विचित्र मोठं....
कोडं विचित्र मोठं....


दुःखाच्या या आसवांत
भेटलं कोडं विचित्र मोठं
वाटून गेलं काहीसं मना
नाहीच जमलं सावरायला
तर आहेच साथ या अश्रूंची
सळसळलेल्या उणिवांची
नाहीच मिळाली सोबत आनंदाची
तर आहेच साथ दुःखाची
नसतील पचत ते आता
पण मागोमाग देतीलच आनंद
नाहीच मिळालं हवं तसं समाधान
तर असमाधानही देईल कधी दाद
नाहीच जमली गट्टी आनंदांश्रूंशी
तर दुःखाच्या वणव्याची स्वैर
जमवेल मनाशी घट्ट मैत्री
हळूहळू नकळत मारेल मिठी
आनंदाच्या सागररूपी मला
अन् होऊन जाईल एकरूप
एकट्या मनाचा त्रागा वाहून जात
करेल नव्या कोड्याला मोकळी वाट